उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला, डोळे पाणावले, म्हणाल्या, दादांचा अखेरचा श्वास…


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने आज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आज कार्यकर्ता मेळावा देखील पार पडला. यावेळी बोलताना त्यांना रडू आवरले नाही. त्या म्हणाल्या, बारामतीतल्या प्रत्येक झाडात, पानात, फुलात, रस्त्याला, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे.

दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं मला वाटतं नाही. दादाचं जाणं ही फक्त माझी, माझ्या कुटुंबाची व्यक्तीगत हानी नाही, तर बारामती, देश, महाराष्ट्राची हानी झाली.

बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय दादाचं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझं दु:ख तळ घरात कोंडलं. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारमतीकरांकडे बघून आला आहे” असं सुनेत्रा पवार बोलल्या. बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता.

बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच दादाचा विश्वास, आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास बारामतीच्या मातीत विसावला” हे बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला, त्यांचे डोळे पाणवले. तसेच तुमचं प्रेम, पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. गेल्या 35-36 वर्षात आदरणीय अजितदादांना आपण प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलं आहे.

दादांनी प्रत्येकवेळी स्वत:च्या मताधिक्क्याचे विक्रम मोडीत काढले. तुमच्या मतांचा बोजा म्हणून मी २४ तास काम करतो असं दादा नेहमी म्हणायचे. दादाच्या माघरी ही पहिलीच निवडणूक आहे. ही केवळ निवडणूक नाही, दादांना श्रद्धांजली अपर्ण करण्याची प्रत्येक बारामतीकराला संधी आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!