उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना होमग्राउंडवरच आव्हान! Zp च्या अध्यक्षपदांसाठी अनेक दावेदार, राष्ट्रवादीन उचलल मोठ पाऊल…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रे या सुनेत्रा पवारांच्या हाती आली आहेत. मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता होमग्राउंडचं आव्हान समोर आलं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. 18 मार्च रोजी होणाऱ्या या निवडीवेळी पक्षात कोणतीही गटबाजी किंवा नाराजी उरू नये, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून थेट अर्ज मागवण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी जुन्यासह नव्या उमेदवारांना अधिक संधी दिली होती. आता अध्यक्षांनी उपाध्यक्षांच्या निवडीचा पीस उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांना सोडवावा लागणार आहे.त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेणार आहेत. या प्रक्रियेमुळे निवडीत पारदर्शकता येईल आणि नाराजी नाट्य टाळता येईल, असा विश्वास पक्षनेतृत्वाला वाटत आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील, अंकिता पाटील ठाकरे, शांताराम इंगोले आदींनी आपला दावा मजबूत केला आहे. या दिग्गज उमेदवारांमुळे निवडीचा पेच अधिकच वाढला आहे. कौटुंबिक आणि राजकीय वारसा असलेल्या या नावांपैकी सुनेत्रा पवार कोणाला संधी देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.