कार्यालयात गेल्या अन् कागदपत्रे बघताच अश्रू अनावर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गहिवरल्या, नेमकं काय घडलं?


मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दुःखातून सावरलेल्या नाहीत. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या एका कार्यालयात बैठकीसाठी गेल्या होत्या.

तसेच यावेळी कागदपत्र पाहत असताना अजित पवारांच्या आठवणीत त्या भावुक झाल्या. कार्यालयातील खुर्चीवर बसल्यावर सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. हा भावूक क्षण कॅमेरात कैद झाला असून जय पवार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तसेच 28 जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांच्या विमानाला गोजूबावी परिसरात अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर आता जवळपास पंधरवडा ओलांडून गेला आहे. परंतु, या दु:खाची झळ पवार कुटुंबावर अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अवघ्या महाराष्ट्रातही अजिजदादांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

आभाळा एवढं दुःख पाठीशी टाकून सुनेत्रा पवार राष्ट्रवादीसाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि कुटुंबासाठी पुन्हा उभा राहिल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार सक्रीय राजकारणात उतरल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!