उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार ; भाजपच्या मंत्र्याचा पुढाकार, काय आहे कारण?

पुणे : सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप -शिंदे गट- राष्ट्रवादी गटात सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा वारंवार होताना दिसत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या एका मंत्र्याच्या पुढाकाराने अडचणीत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तब्बल 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. शिंदे मंत्री असताना त्यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी शिरसाट यांनी नियुक्ती करून कोट्यवधीची जमिन बिवलकर कुटुंबला दिली. रोहित पवार यांनी या संदर्भात भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून जमिनीचा व्यवहार झालेली कागदपत्रे सादर केली.याप्रकरणी विरोधी पक्षाकडे नेमकी कागदपत्रे आली कशी? याची चर्चा सुरू असताना भाजपच्या एका मोठ्या मंत्र्यानेच ही कागदपत्रे विरोधी पक्षांपर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून ही कागदपत्रे विरोधी पक्षनेत्यांकडे पोहोचली का? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला असता त्यांनी यावर उत्तर देताने म्हटले की, मला माहीत नाही. मुळात 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय की नाही याचे उत्तर दिले पाहिजे. बेकायदेशीर पद्धतीने बिवलकर कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचेआदेश डावलून ते कायदेशीर हक्कदार नसताना पाच हजार एकर जमीनीतून जमीन देण्यात आली, असं त्यांनी म्हटले आहे
