उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज ; महापालिकेत अपेक्षित यश नाहीच, कोणत्या मंत्र्यांवर कारवाई होणार?


पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला अधिक चांगल यश मिळालं आहे.पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे जिल्हा वगळता इतर ठिकाणी अपेक्षित यश मिळालेलं नाही. या निकालानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या ठिकाणी यश मिळालं आहे. पण मुंबई, पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही. याशिवाय इतरही महापालिकांमध्येही शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही.या निकालांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची एकनाथ शिंदे यांनी त्या त्या भागातील मंत्र्यांना जबाबदारी दिली होती. संबंधित जिल्ह्याची जबाबदारी त्या भागातील मंत्र्यांवर सोपवण्यात आली होती. तिथे अपेक्षित यश न आल्यास कारवाई केली जाईल, असं शिंदेंनी बजावलं होतं, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता एकनाथ शिंदे अपेक्षित कामगिरी करु न शकलेल्या कोणत्या मंत्र्यांवर कारवाई करणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीत मंत्र्यांकडून अपेक्षित किंवा साजेशी कामगिरी न करण्यात आल्यामुळे शिंदे त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली, मंत्रिपद काढून घेण्यात आलं तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंकडून कुणाला मंत्रिपदाची संधी दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!