उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार, राजकीय चर्चांना उधाण…

मुंबई : एका कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
वरळीतील बहुचर्चित बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे म्हाडाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रमुख उल्लेख आहे. याशिवाय, वरळीचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार म्हणून अरविंद सावंत यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण असणार आहे.यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे म्हाडाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रमुख उल्लेख आहे. याशिवाय, वरळीचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार म्हणून अरविंद सावंत यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण असणार आहे. आदित्य ठारे यांना स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण असले तरी, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.