स्व. बाबुराव पाचर्णे यांच्यासारखा सच्चा व तळमळीचा लोकसेवक होणे दुर्मिळच! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाचर्णे यांच्या स्मारकाचे लोकार्पण…!!

शिक्रापूर : शेतकरी कुटूंबातील सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत जातो, तळमळीने व सच्चेपणाने तो कार्य करतो, कर्तव्य निष्ठा व प्रामाणिकपणाने तो सदैव आपल्या जनतेच्या मनात राहतो, त्यांनी केलेली कामे ही लोकसेवक म्हणून केलेली होती. तर्डोबावाडी येथील स्व. बाबुराव पाचर्णे यांचे स्मारक सर्वसामान्यांना व कार्यकर्त्याना प्रेरणा देणारे राहील असे उद्गार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांना श्रध्दांजली वाहताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

शिरुर तालुक्यातील अखंड ४० वर्षे आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीत संघर्ष योध्दा म्हणून परिचित असलेल्या माजी आमदार आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने तर्डोबाचीवाडी येथील त्यांच्या लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवार (ता.१) रोजी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाचर्णे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे , पत्नी मालती पाचर्णे , जावई कर्नल महेश शेळके ,मुलगी राणी शेळके, बी जी पाचर्णे या कुटूंबियासहीत माजी मंत्री दत्तात्रेय भरणे ,आमदार नीलेश लंके , जिल्हा बॅकेचे संचालक प्रदीप कंद , माजी आमदार पोपटराव गावडे ,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,प्रदीप वळसे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाचर्णे , जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष निवृतीअण्णा गवारी ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर , मानसिंग पाचुंदकर , प्रा.डॉ . राजेराम घावटे, पांडुरंग थोरात , महेश ढमढेरे ,पांडुरंग दुर्गे ,दौलतराव खेडकर ,राजेद्र चव्हाण आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, शिरुर तालुक्यात पाचर्णे यांचे योगदान न विसरता येणार आहे. चासकमान धरण पाणी , रांजणगाव एमआयडीसी, पुणे -नगर या विकासकामाने शिरुरच्या विकासाचे चित्र बदलले.
पाचर्णे हे मनमिळावू कार्यकर्ते होते.शेतकरी ,कामगार व सर्व सामान्यांचे प्रश्न पाचर्णे यांनी सातत्याने मांडले .शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पाचर्णे यांनी कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना स्वंत :ची राजकीय कर्तृत्व व कार्यकिर्द घडविली.
दोन वेळ्या आमदार राहिलेल्या पाचर्णे यांनी विधानसभेत शिरुरचे प्रश्न सोडविण्याचे काम केले . सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्याची हातोटी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यशी स्नेहाचे संबध जोपासले. सामान्य माणसांना पाचर्णे यांच्या विषयी प्रेम ,जिव्हाळा आपुलकी होती असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
प्रास्ताविकात राहूल पाचर्णे यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी ४४ वर्षात सर्वसामान्याचे हित जपले .ते लोकनेते होते . खडतर असे जीवन त्याचे होते .सातत्याने संघर्ष पाचर्णे यांनी केला. संघर्ष योध्दा पाचर्णे यांच्या स्मारकातून कार्यकर्त्याना उर्जा व शक्ती मिळेल .
घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे म्हणाले की, लोकांना न्याय देण्याचे काम करित दोन वेळ्या विधानसभेला शिरुर मधुन बाबूराव पाचर्णे निवडून गेले.शिरुर तालुक्याचा विकास त्यांनी केला .
आमदार नीलेश लंके म्हणाले , पाचर्णे हे सर्वसामान्याच्या सुख दु :खात सहभागी होणारे नेतृत्व होते . प्रदीप कंद म्हणाले की, बाबूराव पाचर्णे यांच्या नेतृत्वामुळे तालुक्याचा विकासाला गती मिळाली. सर्वसामान्याना केंद्रबिंदु मानून पाचर्णे यांनी काम केले ते लोकनेते व सर्वसमावेशक असणारे नेते होते .
यावेळी सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले तर आभार नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी मानले.
मी साहेब तेव्हा एकत्र पण आताही..!
अजित पवार यांनी आपल्या श्रद्धांजलीपर वक्तव्यात आज आवर्जून १९९५ साली झालेल्या शिरुर तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा किस्सा उपस्थितांना ऐकविला.
ते म्हणाले की, बाबुराव पाचर्णे हे त्यांच्या पहिल्या निवडणुकीत निसटत्या ६७९ मतांनी पराभूत झाले. मात्र त्यावेळी उमेदवार असलेले पोपटराव गावडे हे साहेबांचे (शरद पवार ) व बाबुराव पाचर्णे( अजित पवार ) यांचे उमेदवार असल्याचा प्रचार झाला. मात्र तेंव्हाही पवार साहेब आम्ही एकत्रो होतो, आताही आम्ही एकत्र असल्याचा निर्वाळा अजित पवार यांनी केला.