राजगडावर रात्री मुक्काम करण्यास पुरातत्व विभागाकडून बंदी चे आदेश…!
पुणे : राजगड हा ट्रेकिंगसाठी गडप्रेमींचे आवडीचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे रात्री मुक्कामाला येत असतात.गडावर कचरा आणि घाण होत असल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने राजगड किल्यावर रात्री मुक्कामाला बंदी घातली आहे. या आदेशाचा दुर्गप्रेमींनी निषेध केला असून हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान राजगडावर अनेक दुर्गप्रेमी आणि पर्यटक येत असतात. अनेक पर्यटक रात्री टेंट बांधून या ठिकाणी मुक्काम करत असतात. दरम्यान, या मुळे गडावर अस्वच्छता होत असून अनेक पर्यटक कचरा करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपण्यासाठी या गडावर रात्रीच्या मुक्कामी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र हे भोर उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.
तुमचे शासकीय नियम आहेत म्हणून हा आदेश काढला पण असेल तुम्ही, पण असे किती शासकीय नियम तुम्ही किल्ल्यांच्या बाबतीत पळता. काल परवाच राजगड केलेल्या चुकीच्या कामामुळे खूप वादावाद झाला आहे. त्याचा तर बदला नाही ना घेत तुम्ही. अशी बरीच कामे अगोदरच तुम्हीच गडावर केली आहेत. आता तुम्ही कसल्या काळजी पोटी गड मुक्कामास बंद करणार आहात?, असा सवालही त्यांनी केला आहे.