हडपसरमधून सुटणार सोलापूर आणि दौंडसाठी डेमू, सोमवारपासून नवीन वेळापत्रक जाहीर…!


पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या मोठा ताण येत आहे. यामुळे प्रवाशांसाठी हडपसर रेल्वे टर्मिनलवरून येत्या सोमवारपासून पुणे -सोलापूर आणि पुणे – दौंड डेमू या दोन रेल्वे सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

तर अनेकांची गैरसोय देखील होणार आहे. हडपसर टर्मिनल येथून सध्या फक्त हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी धावते. पण, रेल्वे प्रशासनाने हडपसर रेल्वे टर्मिनल येथून काही गाड्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच या नवीन दोन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या दोन रेल्वे आता हडपसरवरून सुटणार आहेत. त्यामुळे हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या आता चार झाली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनच्या यार्ड रिमोल्डिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी साधारण 300 दिवस लागणार आहेत. त्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाकडून हडपसर येथून सहा मार्चपासून नव्याने दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे – सोलापूर डेमू गाडी हडपसर रेल्वे स्टेशन येथून सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. तर, पुणे – दौंड ही डेमू सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी सुटणार आहे.

Views:

[jp_post_view]

3 Comments

  1. हा रेल्वेचा खुप मोठा मूर्खपणा आहे. पुणे स्टेशन ते हडपसर स्टेशन पर्यंत कुठलाही वाहतुकीचा साधन नाहीये. मग लोकांनी अपडाऊन करायचे कसे तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा रेल्वे प्रशासनाने

  2. हडपसर रेल्वे स्टेशन जवळ पोहचण्यासाठी सिटी बस ची सोय आहे का बघा आधी,रेल्वे स्टेशन ला बाय रोड पोहचण्यासाठी रस्ता रुंदीकरण करा आधी..

  3. चुकीचा निर्णय आहे,
    एक्स्प्रेस गाड्या तील डबे कमी होत आहेत
    सर्वसामान्य प्रवासी या ट्रेन चा आधार घेतात.
    खरे तर लोकल ट्रेन सुरु करणे आवश्यक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!