‘ल्यारी’ चा बादशाहा होणार राक्षस गुरु शुक्राचार्य; ‘महाकाली’मधला अक्षय खन्नाचा अंगावर काटा आणणारा लूक लीक


पुणे : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ सिनेमात रहमान डकैतच्या भूमिकेतून आपली छाप पाडणारा अक्षय खन्ना, आता ‘महाकाली’ या चित्रपटात असुरगुरू शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा नवीन लूक लीक झाला आहे.त्याला प्रेक्षकांकडून चांगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा ड्रीम प्रोजेक्ट’ महाकाली ‘मध्ये अक्षय खन्ना ‘असुर गुरु’ शुक्राचार्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्याचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला असून, तो एका ऋषी-मुनींसारखा दिसणार आहे. लांब पांढरी दाढी, केस आणि पारंपरिक वेशभूषेमुळे त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. नुकताच त्याचा ‘फर्स्ट लूक’ प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आदित्य धर यांच्या धुरंधर या चित्रपटात ‘रहमान’ या दरोडेखोराची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता अक्षय खन्ना सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, पहिल्या भागात रहमानच्या मृत्यूनंतरच्या कथाची या भागात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आता अक्षय खन्नाच्या पुढील प्रोजेक्टबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचे सुमारे 40 दिवसांचे शूटिंग अजून बाकी असून, ते हैदराबादमध्ये पूर्ण होणार आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. विविध आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय खन्नासाठी हा चित्रपट आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी सेटवरील अक्षयचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, “तुमचे पडद्यावरील काम अप्रतिम आहे आणि आपण एकत्र काय साकारत आहोत हे जगाला दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे,”या चित्रपटात अभिनेत्री भूमी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!