पुण्यात व्यावसायिकाकडे 5 कोटींची मागणी ; अखेर गुन्हे शाखा अन लष्कर पोलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले…

पुणे : पुण्यातील एका व्यावसायिकाकडे ‘अरुण गवळीचा पीए बोलतोय, ५ कोटी दे’, असे म्हणत तरुणांनी ५ कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली असून खंडणी मागणाऱ्या तिघांना पुण्यात गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे पुण्यातील कॅम्प परिसरात ऑफिस आहे. २०२२ मध्ये यातील आरोपी सुमित चौरे यांच्याशी एका बांधकाम प्रोजेक्ट संदर्भात फिर्यादी यांचा व्यवहार झाला होता. २०२३ मध्ये एक बांधकाम पूर्ण झाले मात्र ते अनधिकृत असल्याने पुणे महापालिकेने ते तोडून टाकले. आर्थिक नुकसान झाल्याने या बाबत पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.२८ जुलै रोजी फिर्यादी यांना एका अज्ञात नंबरवरून “मी प्रशांत पाटील, अरुण गवळीचा पी ए बोलतोय” असा बतावणी करणारा फोन आला. मात्र तडजोडी अंती 50 लाखाची खंडणी देण्याचे ठरले. व्यापाराने तात्काळ पोलिसात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेचा प्लॅन रचला. अखेर तिघांना अटक करण्यात आली.
. सुमित चौरे, रोहन गवारे, सुदर्शन गायके, महेंद्र शेळके आणि कृष्ण बुधनर असे आरोपींचे नाव असून यातील ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी मूळचे बीडचे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.