खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट; छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी…!
नवी दिल्ली : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री शहा यांच्याकडे केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे. ‘याचबरोबर राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे अशीही मागणी केली. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे,अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे . या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, अशी माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
अमित शाह यांनी त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले आहे.