Delhi New CM : आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, आप आमदारांच्या बैठकीत झाला निर्णय….


Delhi New CM : विधानसभा निडणुकांपूर्वीच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या असून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घोषित केला आहे. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते.

आपच्या आमदार आतिशी यांच्या नावावर एकमत झाले असून आता त्या मुख्यमंत्री होणार आहेत. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून केला जात होता.

मात्र, अरविंद केजरीवाल यांना मनाचा मोठेपणा दाखवत, आपल्या पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.

त्यामुळे, शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील, असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरला.

दारू धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयकडून त्यांची चौकशी झाली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आले. Delhi New CM

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता सर्वांना होती. यामध्ये सहा जणांची नावे शर्यतीत होती. यात आतिशी, सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, कुलदीप कुमार, राखी बिर्ला यांची नावं आघाडीवर होती. यात आतिशी यांनी बाजी मारली असून मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!