संरक्षण दलांसाठी विविध शस्त्रास्त्र प्रणालींच्या खरेदीसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी…!


नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलांसाठी विविध शस्त्रास्त्र प्रणालींच्या खरेदीसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना संरक्षण मंत्रालयाकडुन मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण अधिका-यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रस्तावांमध्ये भारतीय नौदलासाठी ६० मेड इन इंडिया युटिलिटी हेलिकॉप्टर मरीन आणि ब्रम्होस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, भारतीय लष्करासाठी ३०७ एटीएजीएस हॉवित्झर, भारतीय तटरक्षक दलासाठी ९ एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरीचा समावेश आहे. एवढेच नाही तर या प्रस्तावांत एचएएलद्वारे निर्मित ६० यूएच सागरी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी भारतीय नौदलासाठी ३२,००० कोटी रुपयांच्या मेगा ऑर्डरचा देखील समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने भारतीय नौदलासाठी ब्रम्होस मिसाईल, शक्ती ईडल्ब्यू सिस्टीम आणि युटिलिटी हेलिकॉप्टर (मरीन) मंजूर करण्यात आले आहेत. त्याची किंमत ५६ हजार कोटी रुपये असेल. भारतीय हवाई दलासाठीच्या एसयू-३० एमकेआय विमानाासाठी लाँग रेंज स्टँड-ऑफ वेपनलाही मान्यता देण्यात आली.

 

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!