पराभव जिव्हारी! राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी उचललं आक्रमक पाऊल; ट्रोल करणाऱ्यांना कायदेशीर…..

पुणे : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. भाजपच्या या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील यांना पराभवाला समोर जावं लागलं. या पराभवामुळे त्यांना ट्रोल करणाऱ्यांना आता त्यांनी कायदेशीर इशारा दिला आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे त्या संतप्त असून बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर त्या कायदेशीर कारवाई करणार आहे.

पुणे महानगरपालिका मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत खरी लढत होती.यामध्ये भाजपने 119 जागांवर विजय मिळवत महापालिकेवर एक हाती झेंडा फडकवला आहे. या लढाईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला.यामध्ये माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांचा सुद्धा समावेश आहे. रूपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमातून टीकेची झोड उठत आहे. याच टीकेविरोधात रूपाली पाटील यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.


रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय की, महापालिकेत झालेल्या पराभवामुळे माझ्यावर टीकेची झोड उठवत असाल तर अशा कमेंट करू नये.
आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी करू नये. अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल.
त्यामुळे माझी विनंती आहे फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्या ट्रोलर्सनी माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये. जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये,” असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
