पराभव जिव्हारी! पुण्यात शिंदेची शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देणार ; कार्यकारणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय?


पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.लोकसभा तसेच पुणे शहरातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली जाणार असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.नवीन कार्यकारणी संदर्भातील नियुक्त्या लवकरच जाहीर होणार आहेत.

पुणे शहरातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची नवीन टीम तयार केली जाणार आहे. शहराध्यक्ष नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, रवींद्र धंगेकर यांच्याकडे असलेले महानगरप्रमुख पद हे फक्त प्रभारी असणार आहे. बाकी सर्व महिला आघाडी युवासेना कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून रवींद्र धंगेकर, अजय भोसले,नाना भानगिरे आणि आबा बागुल यांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन संघटना मजबूत करण्याचे आदेश काल झालेल्या पुण्यातील बैठकीत देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आधी युतीमध्ये लढण्याची तयारी दर्शवलेल्या शिवसेनेने एकला चलो रे चा नारा देत स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवली मात्र पक्षाला एका ही ठिकाणी यश मिळालं नाही. पुणे शहरातील 41 प्रभागांपैकी शिवसेनेने बहुतांश सगळ्याच प्रभागात आपले उमेदवार दिले होते. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेत कार्यकारणी बरखास्त केले आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यासोबत येणाऱ्या काळात पक्षाची नवीन रणनीती ठरविण्यात आली. आता या नव्या कार्यकारणी मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून यामध्ये कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!