बदनामीकारक पत्रके वाटली, तरुणीचे मोडले लग्न, ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख मागितले, पुण्यात धक्कादायक प्रकार..


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबाविषयी बदनामीकारक मजकूर असलेले पत्रक मशिदमध्ये वाटले. मुलाच्या घरातील लोकांना दुसरे पत्रक पाठविल्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. बदनामी थांबवायची असेल तर १५ लाख रुपये द्या, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.

तसेच याबाबत कोणाला सांगितले तर घरातील मुलीचा चेहरा अश्लिल व्हिडिओवर लावून व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आहे. पोलिसांनी जाहीद जाकी शेख (रा. ससाणेवाडा, भवानी पेठ) आणि २ अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपास सुरू आहे. कॅम्पमधील चोक्सी शाळेजवळील आयकॉन ऐव्हेन्यू येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांचे कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवर दुकान आहे. त्यांच्या बहिणीचे लग्न ठरले होते. येथील मस्जिदमध्ये छापिल पत्रके वाटण्यात आली. फिर्यादी यांच्या मित्रांनी ते पत्रक आणून दिले. त्यावर फिर्यादी यांच्या आई वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक मजकूर लिहिला होता. यामुळे त्यांना धक्काच बसला.

त्यांच्या बहिणीचा साखरपुडा ठरविण्यात आला होता. त्याच्या आधल्या दिवशी फिर्यादी यांचे आईवडिल, बहिणीविषयी बदनामीकारक मजकूर लिहिलेले पत्रक बहिणीच्या भावी पतीकडे पाठविण्यात आले. हे पत्रक वाचून त्यांनी बहिणीचे लग्न मोडले. यामुळे वाद चव्हाट्यावर आला.

या घटनेने फिर्यादी यांच्या बहिणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. नंतर फिर्यादी जाहिद शेख याला भेटले असता त्याने बदनामी थांबवायची असेल तर आम्हाला १५ लाख रुपये दे. जर पैसे दिले नाही तर घरातील मुलींचे फोटोचे अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करेल, अशी धमकी दिली. यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. याबाबत पोलिसांनी कारवाई केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!