दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण ; लग्नाच्या बोलीच्या बाजारात मुलींचा लिलाव, आरोपींना कठोरात कठोर…. ; रूपाली चाकणकर भडकल्या

पुणे: पुण्यात हवेली परिसरात राहणाऱ्या एका इंजिनियर विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या गंभीर प्रकरणाची दखल आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली आहे. दिप्ती मगर चौधरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. चाकणकर यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच सांत्वन केलं.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हुंडाबळीचा निषेध केला आहे.लग्नाच्या बोलीच्या बाजारात मुलीचा लिलाव केला जातोय का?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारत फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकामार्फत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान या भेटीदरम्यान दिप्तीच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक महिलांनी रुपाली चाकणकर यांना ‘अशा घटना कधी थांबणार?’ असा जाब विचारत काही वेळ धारेवर धरले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी (पती आणि सासू) यांना सध्या ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवकरच या आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल अशी आश्वासन त्यांनी दिलें.

तसेच दीप्तीला गर्भपातासाठी कोणाकडून दबाव होता आणि तो कोणत्या रुग्णालयात करण्यात आला, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पोलीस आणि वैद्यकीय विभागाला चाकणकर यांनी दिले आहेत.
