Deepika Padukone : लग्न रणवीर सिंगसोबत पण दीपिकाला ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची व्हायचंय आई, दीपिकानेच केला धक्कादायक खुलासा…

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचा समावेश होतो. ती नेहमी चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विन डीजलसोबत दिसत आहे. ते दोघेही एका चॅट शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केले. महत्त्वाचे म्हणजे दीपिकाने तिला विन आवडत असल्याचे सांगितले.
इतकंच नाही तर तिची विन डीजलच्या मुलाची आई होण्याची माझी इच्छा होती, असेही दीपिकाने म्हटले होते. दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. Deepika Padukone
दीपिकाने विनबद्दल भाष्य केले तेव्हा तिचा अभिनेता रणवीर सिंहसोबत साखरपुडा झाला होता. रणवीरसोबत साखरपुडा झाल्यानंतर दुसरा कोणाचा विचार कशी करू शकते यावरुन नेटकऱ्यांनी दीपिकाला प्रचंड ट्रोल केले होते. दीपिकाच्या या वक्तव्याने रणवीरचे चाहते मात्र नाराज झाले होते. आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.