ठरलं! 10 जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचणार, शेतकऱ्यांचे लागले लक्ष…


मुंबई : अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे पासून अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने २९मे रोजी वेग पकडला असून . १५ जूनपासून देशातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

तसेच हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते, परंतु तो ३१ मे रोजी त्या स्थितीत पोहोचला. त्यामुळे नेहमीपेक्षा एक आठवडा उशिराने अस्तित्व दाखवत आहे.

मान्सूनचा वेग पाहता १ जूनला कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य मोसमी पाऊस केरळ आणि तामिळनाडूमध्ये ५ जूनपर्यंत सुरू होईल, असा अंदाज आहे. १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल.

१५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. २० जूनपासून राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पाऊस पडेल. मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!