शिरूरमध्ये मध्यरात्री मृत्यूच थैमान! कार अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर..


पुणे: पुण्यातील शिरूर तालुक्यात मध्यरात्री एका कारचा जोरदार भीषण अपघात झाला. या अपघातात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने शिरूर तालुका हादरला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील निमोणे गावाजवळ शिरूर–न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती परिसरात मध्यरात्री कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पवन काळे, आराध्या काळे आणि बाळासाहेब नागवडे अशी मृत्यू झालेल्या लोकांची नावं आहेत. या घटनेने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातात एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून गंभीर झालेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतली असून पोस्टमार्टम साठी पाठवले आहेत.

दरम्यान पोलिसांकडून वाहन ताब्यात घेऊन अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. वेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा रस्त्यावरील परिस्थिती यापैकी कोणता घटक कारणीभूत ठरला, याचा शोध घेतला जात आहे.या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!