नागपूर स्फ़ोटातील मृतांचा आकडा वाढला ; मुख्यमंत्री फडणवीसांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश…


नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एसबीएल कंपनीत सकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. या स्फ़ोटातील मृतांचा आकडा आता वाढत चालला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,नागपूर जिल्ह्यातील एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे. हे घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

नागपूर जिल्ह्यातील या फॅक्टरीमध्ये बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवली जातात. सकाळी झालेला स्फ़ोट इतका भीषण होता की,या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर सर्व मृत कामगारांचे पार्थिव वैद्यकीय आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ॲम्बुलन्सद्वारे आणण्यात आले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. घटनेतील पिडीतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखाची मदत दिली जाईल तर घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकृत पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधानाच्याकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!