भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस यंत्रणा सावध, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय..


मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशातच आता भाजपच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सत्ताधारी आमदाराला अशा प्रकारे धमक्या मिळत असल्याने चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये आता भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पळत ठेवली जात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी पत्रात केला आहे. याबाबत अजून कोणावर कारवाई केली गेली नाही.

याबाबत त्यांनी नाव देखील सांगितले आहे. गायकवाड नाव असणारी व्यक्ती विविध मार्गाने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे, असे पत्रात प्रसाद लाड यांनी नमूद केले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर प्रसाद लाड यांच्याशी चर्चा केली आहे.

तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणानंतर प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत वाढ होऊ शकते. दरम्यान, याबाबत अजून कोणाला ताब्यात घेतले नाही. सध्या याची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!