राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, टाकीत पडल्याने गेला जीव…

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावरून दुर्दैवी घटना घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.
अजय मोहनन कल्लामपारा (वय-33 रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लि. कंपनीत काम करीत होता.
मिळालेल्या माहिती नुसार, ठाणे येथील चार पर्यटक रात्री राजगडावर गेले होते. रात्रीच्या सुमारास अजय जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता.
त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्यासोबत आलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. सकाळी तो पाण्याच्या टाकीत आढळून आला.
Views:
[jp_post_view]