लाडक्या बहिणींना मिळणार आनंदाची बातमी, योजनेबाबत महत्वाची माहिती आली समोर, जाणून घ्या…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

गेल्या काही महिन्यांपासून हफ्ते अनियमित झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. विशेषतः जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने अनेक महिला प्रतीक्षेत होत्या.
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे आणि प्रशासकीय कारणांमुळे काही महिन्यांपासून निधी वितरणात विलंब झाला. आता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी अखेर येत असतानाही हप्ता न मिळाल्याने प्रश्न उपस्थित होत होते.

लवकरच खात्यात जमा होणार रक्कम…
अशातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्याच्या हफ्त्यासाठी सरकारने निधी उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून तब्बल ९८.२५ कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून निधी वर्गीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याने पुढील काही दिवसांत जानेवारीचा प्रलंबित हप्ता जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.