लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! योजनेत होणार मोठा बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्रता निकषांची आता अधिक काटेकोरपणे तपासणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेत अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने आता थेट इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने ही बाब तपासण्याची तयारी दर्शवली आहे.

तसेच दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या या योजनेचा लाभ काही अपात्र महिलांनी घेतल्याची शक्यता असल्यामुळे सरकारने ही गंभीर बाब म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, अशा महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, आणि दर महिन्याला अपात्र लाभार्थींची संख्या वाढताना दिसत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी योजनेतील लाभार्थींची आधार क्रमांकासह यादी इन्कम टॅक्स विभागाकडे सुपूर्द केली होती. यामध्ये संबंधित महिलांचे उत्पन्न, वाहन मालकी अशा अनेक मुद्द्यांवर माहिती तपासण्याची मागणी केली होती.

विशेषतः, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत, अशा महिलांची पडताळणी करणे यामागचा प्रमुख उद्देश आहे. या प्रक्रियेची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये लवकरच सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. यामुळे योजनेतील चुकीच्या लाभार्थींना वेळीच वगळून खऱ्या पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवणे सुलभ होणार आहे.

ही योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली होती. त्यामुळे तिच्या अंमलबजावणीबाबत सरकार अत्यंत गंभीर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, सरकार आणि इन्कम टॅक्स विभागातील संवाद अंतिम टप्प्यात असून लवकरच ठोस निर्णय अपेक्षित आहे. या तपासणीमुळे खोट्या माहितीच्या आधारावर लाभ घेणाऱ्यांचे कंबरडे मोडले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!