लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे चारचाकी आहे का? आता घरोघरी जाऊन सरकार तपासणी करणार, थेट गुन्हाच दाखल होणार, जाणून घ्या…

पुणे : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना काही महिन्यांपासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू होणार आहे. आता बहिणींचे टेन्शन वाढले आहे.

ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहे. या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहिम राबवली आहे. आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्याकडे तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे. जर त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे
निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रे लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची धास्ती राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिलां स्वतःहून मिळालेला लाभ नाकारत आहेत. दरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

जानेवारी २०२५ पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दिड हजार रुपये प्रमाणे १० दहा हजार ५०० रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा लाभ नाकारत अर्ज करताना दिसत आहेत. जानेवारी महिन्याचा हफ्ता काही दिवसांपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.
शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांवर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे.
याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले. सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.