माफिया अतिक अहमदच्या कार्यालयात रक्ताचे डाग, महिलेची अंतर्वस्त्रे सापडल्याने उडाली खळबळ
लखनौ : उत्तरप्रदेश माफिया अतिक अहमदच्या प्रयागराजमध्ये चकिया येथे कार्यालय आहे. या कार्यालयाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. याठिकाणी पहिल्या मजल्यावर पोलिसांना एका महिलेची साडी व अंतर्वस्त्रे पडलेली सापडली. यामुळे पोलीस तपास करत आहेत.
अतिकच्या कार्यालयात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह बाहेर कुठेतरी फेकून दिला गेला आहे. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामुळे पोलीस तपास करत आहेत.
तसेच माफिया अतिक अहमदच्या कार्यालयात तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. याठिकाणी रक्ताचे डाग व रक्ताने माखलेला चाकू पाहून पोलीस देखील थक्क झाले आहेत.
याठिकाणी असणारे रक्ताचे डाग अगदी ताजे आहेत. तसेच रक्ताने माखलेल्या काही बांगड्या देखील पोलिसांना तपासात मिळाल्या आहेत. यामुळे वेगळी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. या कार्यालयात पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळल्याने सखोल तपास सुरू झाला आहे.
याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल असे प्रयागराजचे एसपी सत्येंद्र तिवारी यांनी म्हंटले आहे. दोन वर्षांपूर्वी योगी सरकारने अतिकचे कार्यालय पाडले आहे. या कार्यालयाचे काही अवशेष अजूनही तसेच असून निम्म्याहून अधिक भाग बुलडोझरने पाडला आहे.