Daund : आम्ही तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्या निर्णयाची कीव येते, दौंडमध्ये शरद पवार गटात नाराजी, थोरातांना उमेदवारी दिल्याने आप्पासाहेब पवार गट आक्रमक..
Daund दौंड : दौंडमध्ये शरद पवार गटात नाराजी पसरली आहे. रमेश थोरातांना उमेदवारी दिल्याने आप्पासाहेब पवार गट आक्रमक झाला असून एक पत्र व्हायरल झाले आहे. यामध्ये राजकारण करत असताना प्रत्येक जण स्वार्थ पाहतोय खासदार सुप्रिया ताई सुळे आपण आमच्या भावनांचा खेळ केलेला आहे, असे म्हटले आहे.
तसेच ज्या व्यक्तीने तुमच्या वाईट वेळेत तुमची साथ दिली. जिथे तुम्हाला कोणी साथ द्यायला तयार नव्हते. तेव्हा अप्पासाहेब तुमच्यासाठी मैदानात उतरले आणि मदत केली तुम्ही तुमची पोळी भाजून घेतली आणि निष्ठावंत संयमी विश्वासू माणसावर तुम्ही जाणून बुजून अन्याय केला का? हा प्रश्न तयार होतोय. आम्हला काय कोणाच्या दरात जायची गरज पडत नाही. पण तुम्ही दिलेल्या उमेदवाराला पडायची ताकत पण आमच्यात आहे.
तुमचा गर्व हरण करायची ताकत आमच्यात आहे. हे पण लक्षात ठेवा एक कार्यकर्ता काय करू शकतो. हे तुम्ही लोकसभेला पाहिलेलं आहे ती वेळ परत येऊ नये असं वाटत असेल तर चंद्रावरून खाली या. नाहीतर तुमच्या विषयी असणारा आदर आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची पायमल्ली केली जाऊ शकते. स्वार्थी लोकांमधे तुमची पण गिनती करावी का हा प्रश्न उभा राहतोय पण ठीक आहे.
तुम्ही तुमच्या राजकारणासाठी काय निर्णय बेरजेचे गणित करून घेतले. असेल तर ते आम्हाला माहीत नाही. पण राजकारनात सगळे तुम्हाला सोडून गेले. तेव्हा आम्ही च होतो हे लक्षात ठेवायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी काम केलाय. म्हणून आज तुम्ही चुकीचं की बरोबर निर्णय घेतला याची किव येते राग येतोय तुमचा निर्णय तुम्हाला शुभेच्छा. निष्ठावंत अप्पासाहेब प्रेमींची प्रतिक्रिया, असे पत्र व्हायरल झाले आहेत.