दौंड तालुका हादरला! माळेवाडी येथे महिलेवर उसाच्या शेतात नेवून सामुहिक बलात्कार, 5 जणांवर गुन्हा दाखल..

दौंड : माळेवाडी, (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी लघुशंका करण्यासाठी घराच्या बाहेर गेलेल्या एका महिलेला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबत 5 जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला हि आपल्या वडिलांच्या घरी माळेवाडी, लिंगाळी येथे असताना ती घराच्या पाठीमागे लघुशंका करण्यासाठी गेली होती. यावेळी त्या ठिकाणी आरोपी राजू काळे, संदीप काळे, सुरज पवार, निलेश चव्हाण व जितेंद्र चव्हाण हे सर्वजण घराच्या पाठीमागे आलेले होते. त्यांच्यापैकी राजु काळे याने जबरीने उसात उचलून नेले.
तसेच तिला तु आमच्या घरी पोलीस कशाला पाठवले असे बोलून दमदाटी करू लागले. तेव्हा फिर्यादीने मी पोलीस पाठवले नाही असे सांगीतले तरी राजु काळे व निलेश चव्हाण या दोघांनी अंगावरचे कपडे जबरीने काढले. तर संदीप काळे, जितेंद्र चव्हाण व सुरज पवार या तिघांनी पकडून राजु काळे व निलेश चव्हाण या दोघांनी जबरदस्तीने बलात्कार केला.
काही वेळानंतर महिलेला सोडून दमदाटी करून निघून गेले. दरम्यान, याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी गु. र. नं. 502/2025, भादंवि कलम 70(1), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.