Daund Railway Station : आता दौंड जंक्शन पुणे विभागाला जोडणार, अनेक अडचणींवर होणार मात, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश…


Daund Railway Station : दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा सुरु केला होता. त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे पाठपुरावा करत असलेल्या सोलापूर रेल्वे विभागाकडे वर्ग असलेल्या दौंड जंक्शन (रेल्वे स्थानक) आता पुणे रेल्वे विभागाला जोडले जाणार आहे. याला आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

येत्या एक एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अनेकवेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरु होता. यास यश आले असून, या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार असल्याचे म्हटले आहे.

याठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे कसे गैरसोयीचे होते. याबाबत यामुळे अनेकदा अडचणी येत होत्या. ही बाब सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आली. त्यांनी नकाशासहित रेल्वे मंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. Daund Railway Station

तसेच लोकसभेत त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक होते. दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात.

शेतकरी, व्यापारी, तसेच शिक्षणासाठी दररोज विद्यार्थ्यांचा दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटणे सोपे होणार आहे. यामुळे आता लोकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. यामुळे काही अडचण देखील आली की लगेच याबाबत कार्यवाही केली जाते. कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होईल. यामुळे प्रश्न लवकर सुटतील.

यामुळे याबाबत हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी करीत होते.दौंड स्थानक येत्या एक एप्रिल पासून पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली. यामुळे आता अनेक अडचणी कमी होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!