दौंड रेल्वेच्या रँक लागली आग ; मोठा अनर्थ टळला…!
दौंड : दौंड रेल्वे यार्डामध्ये बाजूला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रँक मधील एका बोगीला आज (ता. ०३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दौंड रेल्वे यार्डात रेल्वे गाडी उभी करण्यात आली होती. या रेल्वेच्या रँक मधील एका बोगीला अचानक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली.
रेल्वे प्रशासनाने तातडीने दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्निशामक गाडी मागून आग आटोक्यात आणली.
दरम्यान ,आग कशी लागली याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून तर्कवितर्क काढले जात आहेत. विशेष म्हणजे ज्या बोगीला आग लागली तेथून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा हा केवळ पन्नास फुटावर होता.
Views:
[jp_post_view]