Daund News : बोरमलनाथ मंदिराच्या परिसरात आज महाआरोग्य शिबीर, आरोग्यदूत आमदार राहुल कुल यांची माहिती….


Daund News : दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून येत्या गुरुवारी (ता.१९) महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

तसेच आतापर्यंत दौंड तालुक्यासह राज्यभरातील अनेक रुग्णांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदतही मिळाली आहे. आता येणाऱ्या गुरूवारी देखील तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबीर असून, सर्व गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार कुल यांनी केले आहे.

सन २०१७ पासून कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य महाशिबिर आयोजित केले जाते. गेली सलग चार वर्षे ही शिबिर आयोजित केले जात असून येत्या गुरुवारी (दि १९ ) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चौफुला बोरीपार्धी येथील श्री. बोरमलनाथ मंदिर याठिकाणी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. Daund News

या महाआरोग्य शिबीरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.‌ सन २०१७ ते २०२० अशा सलग ४ वर्षी हे शिबीर घेण्यात येत होते.

तसेच कोविड – १९ च्या कालावधीत आमदार कुल यांनी तब्बल २०० व्हेंटीलेटर बेड व १०० बेडचा विलगीकरण कक्ष असे ३०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर चौफुला परिसरात सुरु केले होते. त्यामध्ये सुमारे ३५०० हून कोविड बाधित गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.

दरम्यान, तालुक्यातील रुग्णांची होणारी हेळसांड आणि रुग्णालयात भरमासाठ वाढणारी बिलाची यादी यामुळे गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागणारा आर्थिक भुर्दंड, पैशाअभावी अनेक रुग्णांनी आपला जीव गमवावा लागतो, या गोष्टींना आळा बसवा आणि गोरगरीब रुग्णांना आर्थिक दिलासा देणारा निर्णय दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!