Daund News : गुटख्यावर फक्त नावालाच बंदी, दौंडमध्ये खुलेआम होतेय विक्री, वाहतूकही जोरात सुरू, पोलिसांची होतेय छुपी मदत?


Daund News : राज्यात गुटख्यावर बंदी आहे. यामुळे वाहतूक देखील केली जात नसल्याचे सांगितले होते. असे असताना दौंड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदा गुटख्याची विक्री आणि वाहतूक होत असल्याचे दिसत आहे. तसेच पाटस पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बेकायदा गुटख्यावर कारवाई केली होती.

असे असताना मात्र तरीही हॉटेल आणि ढाब्यासमोरील पानटपरी, किराणा मालाची दुकाने यामध्ये एवढा गुटखा येतो तरी कुठून? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलीसांच्या सोयीस्कर दुर्लक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मदतीशिवाय हे शक्यच नाही असे बोलले जात आहे. राज्यात गुटखा विक्री आणि वाहतुकीवर बंदी असली तरी गुटखा उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्या आणि हा गुटखा खाण्यावर मात्र कोणतेही निर्बंध नाहीत.

परिणामी राज्य सरकारने अवैध ठरवूनही बंदी घातलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात सोप्या पद्धतीने वाहतूक आणि विक्री केली जाते ही वस्तुस्थिती आहे. दौंड आणि यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा गुटख्याचे साठे, त्याची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे चित्र आहे. Daund News

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटस, यवत, वरवंड, केडगाव गावांमध्ये गुटखा विक्री विक्रीचे मोठं रॉकेट असून एजंट किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर गुटख्याची वाहतूक करून पुड्याच्या पुड्या खुलेआम विक्री करीत आहेत.

तशीच परिस्थिती दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दौंड शहरात गुडख्याचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊन मधूनच कुरकुंभ, पाटस, एमआयडीसी, खडकी तसेच आजूबाजूंच्या गावांमध्ये हॉटेल आणि ढाब्यासमोरील पान टपऱ्यांमध्ये विक्रीसाठी ठेवला जातो.

दरम्यान, यवत, केडगाव, वरवंड आणि दौंड शहर त्या ठिकाणी गुटख्यांच्या गाड्या खाली होत आहेत, अशी गोपनीय माहिती मिळत आहे. हा सर्व प्रकार यवत आणि दौंड पोलिसांना माहिती आहे. यवत आणि दौंड पोलीस ठाण्याच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा बेकायदा गुटखा विक्रीचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे.

ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित बेकायदा गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांवर ठोस अशी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे. तसेच याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!