Daund News : आता बहुजन एल्गार! चौफुला येथे आज बहुजन मेळावा, धनगर, ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा..


Daund News : (ता.दौंड ) येथील चौफुला (बोरीपार्धी ) येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आज बुधवारी (दि. ८) सकाळी अकरा वाजता एससी, एसटी आणि ओबीसींचा बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मराठा आरक्षण, ओबीसी आणि धनगर आरक्षण या विषयावर विचार मंथन होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सरसकट मराठा समाजाला देऊ घातलेल्या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याची शक्यता वर्तवत यास तीव्र विरोध दर्शविला होता. Daund NewsDaund News

त्यानंतर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने भुजबळ यांच्या त्या वक्तव्यावर आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज द्यावी अशी मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात धनगर आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चौफुला (बोरीपार्धी) येथे बहुजन मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे.

या मेळाव्यात विविध राजकीय पक्षात काम करणारे ओबीसी नेते तसेच सामाजिक संघटना, विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी वर्ग ही उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. तालुक्यातील एससी, एसटी आणि ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन ही संयोजकांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून पेटलेले मराठा आरक्षण आता कुठे तरी शांत होता होता धनगर आणि ओबीसी आरक्षणावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!