Daund News : दौंडमध्ये भीमा नदीच्या पात्रात घडलं भयंकर, शाळकरी पोरं पोहायला नदीत उतरली थेट मृतदेहच हाती लागले….


Daund News दौंड : दौंड तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुले वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. तिघांपैकी एकाचा मृतदेह शनिवारी सापडला होता तर रविवारी दोनमुलांचे मृत्यूदेह शोधण्यात पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. Daund News

विशाल दिलेराम सिंग (वय. १६), निखिल नरेषसिंग कुमार (वय. १५) आणि अमित रामेश्वर राम (वय. १६, मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर ) अशी या मुलांची नावे आहेत. यातील अमित राम याचा मृतदेह मिळाला होता तर दोघांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. Daund News

दौंड तालुक्यातील हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय. ४५) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल आणि मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार आणि निरजकुमार असे सहा जण शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, यामधील तीघे जण नदीच्या पात्रात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात यवत आणि पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छीमार यांच्या होडीतून आणि ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले.

दरम्यान, यावेळी शनिवारी अमित राम याचा मृतदेह मिळून आला होता. रविवारी सकाळी एक मृतदेह कानगाव हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तर दुसरा हातवळण हद्दीत शोधण्यात यश आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!