Daund : दौंडमध्ये महायुतीत महाबिघाडी, अर्ज कोण माघारी घेणार? तालुक्यात रंगली चर्चा…


दौंड : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी असल्याने बंडोबांना थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत तर पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळाच पेच निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील महायुती मधून एकमेव मतदार संघ भाजपला देण्यात आलेला असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अधिकृतपणे अजित पवार यांचे जवळचे समर्थक दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांना एबी फॉर्म देत महायुतीतच महाबिघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच अजित पवार गटाचे नेत्या वैशाली नागवडे यांनी ही जागाच अजित पवार गटाला देण्यात यावी अशी मागणी केल्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये महा बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वीरधवल जगदाळे रिंगणात आल्यास दौंडला चौरंगी सामना होण्याची शक्यता निर्माण झाली असून वीरधवल जगदाळे दौंडच्या पूर्व भागात एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात बाबा या नावाने परिचित असलेल्या जगदाळे कुटुंबाचा राजकीय इतिहास मोठा आहे.

यांचे वडील बाळासाहेब जगदाळे आणि आई उषादेवी जगदाळे यांनी दौंड विधानसभेचे लोकप्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे वीरधवल जगदाळे रिंगणात राहिल्यास जुना जेष्ठवर्ग जगदाळे कुटुंबाकडे जाऊ शकतो याचा तोटा महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना बसू शकतो असे सांगितले जाते तर दुसरीकडे यांचा तोटा तुतारीचे उमेदवार असणाऱ्या माजी आमदार रमेश थोरात यांना देखील जगदाळे अडचणीचे ठरू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीतच जगदाळे यांच्या उमेदवारी अर्जाने दौंड तालुक्यातील महायुती मध्ये महा बिघाडीच्या वाटेवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!