दौंडच्या भीमा नदी पात्रात मृतावस्थेत आढळले संपूर्ण कुटूंब, धक्कादायक माहिती आली समोर…!

दौंड : दौंड येथील भीमा नदीत एक कुटूंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहाण्यासाठीचे सामान पाल ठोकुन राहाण्याचे साहीत्यासह घेऊन निघोज या गावातून निघुन गेलेल्या या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह आढळले आहेत.
याबाबत चौकशी केली असता चार मृतदेहांची ओळख पटलेली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. १८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले आहेत. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्याप ही शोध लागला नाही.
दरम्यान, ही आत्महत्या आहे की अपघात आहे की घातपात. याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली.
यामध्ये मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे, अशी सापडलेल्या मृतदेहाची नावे असुन त्यांच्या सोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले आहेत. हे भटकंती करणारे हे कुटुंब आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.