Daund Crime : पाटसच्या पेट्रोल पंपावर पिस्तूल दाखवून चोरी, इंदापूरमधील दोघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले..
Daund Crime दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने येऊन दोघांनी पिस्तूल रोखले व पेट्रोल पंपावरील रक्कम चोरून नेली.
त्यानंतर पोलिसांनी शेतात पळून गेलेल्या चोरांना पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर शिताफिने पकडले. शनिवारी (ता.३०) रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. Daund Crime
याप्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, मात्र यामध्ये हे दोघेही आरोपी सापडले असून, इंदापूर तालुक्यातील ते दोघे असल्याचे माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अनिकेत दादासाहेब ढोपे (वय. २२ वर्ष रा. शेळगाव ता. इंदापूर, जिल्हा पुणे), धनंजय लक्ष्मीनारायण हगारे (वय. २० वर्षे, रा. अंथूर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीधर अशोक भागवत यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, शनिवार (ता .३०) सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर भागवत हे नेहमीप्रमाणे काम करत असताना दोघेजण टीव्हीएस आपाची या मोटरसायकल वरून आले.
दरम्यान, या दुचाकी ला क्रमांक नव्हता. त्यापैकी एका जणाने पिस्तूल काढून भागवत यांना कानाजवळ लावला व पिस्तुलाचा धाक दाखवून तुझ्याकडे सर्व पैसे काढ, नाहीतर गोळी घालील अशी धमकी दिली आणि चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दुसऱ्याने धारदार लोखंडी कोयत्याच्या चपट्या बाजूने मारहाण केली