Daund Crime : धक्कादायक! पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर ८ वर्ष बलात्कार, उकळले ३५ लाख रुपये, कुटूंबानेही केली मदत…
Daund Crime दौंड : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला मी मोठा पोलीस अधिकारी आहे, असून सांगून तब्बल आठ वर्षे बलात्कार करून त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून ३५ लाख रुपये लुटल्याची घटना उघडकी आली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात त्या तोतया पोलिसाच्या कुटुंबियांनीही मदत केल्याने त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी दौंड शहरातील( Daund Crime) ठाकूर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. मनीष बिलोण ठाकुर, हन्ना मनीष ठाकुर, संदेश मनीष ठाकुर, श्वेता मनिष ठाकुर ( सर्व रा.डिफेन्स कॉलणी,निरंजन बिल्डींग दौंड जि.पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत. हासंपूर्ण प्रकार ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२३ पर्यंत घडला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मुख्य आरोपी मनीष ठाकूर याने पिडीत महिलेला वेळोवेळी स्वतः पोलीस नसताना मी पोलीस आहे असे पीडित महिलेला सांगून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व याबाबत कोणाला सांगितले तर कुटुंबातील लोकांना ठार मारेल अशी धमकी दिली आहे.
तसेच मनिश ठाकुर व त्याची पत्नी हन्ना, मुलगा संदेश व मुलगी श्ववेता यांनी संगनमताने पीडित महिलेला अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सन २०१५ ते २०२३ दरम्यान वेळोवेळी एकुण ३५ लाख रूपये रोख स्वरूपात घेतले.
मनीष ठाकुर हा स्वत मोठा पोलीस अधीकारी आहे असे पिडीत महिलेला सांगत होता, तसेच मोठमोठे पोलीस अधीकारी माझे मित्र आहेत, तु पोलीस ठाण्यात गेली, तरी मला काही फरक पडणार नाही असे म्हणुन सातत्याने धमकावत असल्याने पीडित महिलेने घाबरुन बरेच दिवस तक्रार दाखल केली नाही.
मात्र अखेर या पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक हिम्मत शेडगे यांना सविस्तर हकीकत सांगितली. आणि यवत पोलिसांनी या पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ठाकूर कुटुंबावर बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.
मुख्य आरोपी मनीष ठाकूर याने पिडीत महिलेला ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२३ रोजी पर्यत वेळोवेळी स्वतः पोलीस नसताना मी पोलीस आहे असे पीडित महिलेला सांगून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व याबाबत कोणाला सांगितले तर कुटुंबातील लोकांना ठार मारेल अशी धमकी दिली, तसेच मनिश ठाकुर व त्याची पत्नी सौ. हन्ना, मुलगा संदेश व मुलगी श्ववेता यांनी संगनमताने पीडित महिलेला अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सन २०१५ ते २०२३ दरम्यान वेळोवेळी एकुण ३५ लाख रूपये रोख स्वरूपात घेतले.
मनीष ठाकुर हा स्वत मोठा पोलीस अधीकारी आहे असे पिडीत महिलेला सांगत होता, तसेच मोठमोठे पोलीस अधीकारी माझे मित्र आहेत, तु पोलीस स्टेशनला गेली, तरी मला काही फरक पडणार नाही असे म्हणुन सातत्याने धमकावत असल्याने पीडित महिलेने घाबरुन बरेच दिवस तक्रार दाखल केली नाही.
मात्र अखेर या पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक हिम्मत शेडगे यांना सविस्तर हकीकत सांगितली. आणि यवत पोलिसांनी या पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ठाकूर कुटुंबावर बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.
पोलिसांनी केले आवाहन…
या आरोपींनी यवत परिसर व दौंड परिसरामध्ये जर अशा प्रकारे कोणाची धमकी देऊन फसवणूक केली असेल तर त्यांनी यवत पोलीसांशी संपर्क साधावा. असे आवाहन यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.