Daund : दौंड तालुक्यातील बोरीभडक येथील वसुंधरा मिल्क कंपनीत मोठा दरोडा, आरोपी अटकेत…
Daund : दौंड तालुक्यातील बोरीभडक गावात वसुंधरा मिल्क अँड ऍग्रो फुडस् कंपनीत चोरटयांनी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोड्यामध्ये चोरट्यांनी कोल्डरूम युनिट व वजनकाटा असा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेला आहे.
ही घटना (ता. ३० ) मे रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तसेच याप्रकणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सोमनाथ मोरे (वय. २०) लक्ष्मण सोनवणे (वय २३) मनोज सोनवणे (वय. १९) तिघेही राहणार चंदनवाडी, गौरव दुर्गुडे (वय. २०) डाळिंब, सुमित नेटके (वय. २१) दत्ता साळवे (वय. १९) दोघेही राहणार सहजपूर यांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. Daund
सविस्तर माहिती अशी की, बोरीभडक गावच्या हद्दीत वसुंधरा मिल्क अँड ऍग्रो फूड्स ही कंपनी आहे. या बंद पडलेल्या कंपनीत पहाटेच्या वेळी दरोडा पडल्याची घटना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर तपास, शोधकार्य सुरू केल्यानंतर बोरीभडक – चंदनवाडी, सहजपूर, डाळिंब परिसरातील आरोपींनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी कोल्ड स्टोरेज युनिट, वजन काटा असा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.