Daund : दौंड येथील व्यावसायिक अमोल साळुंखे खून प्रकरणी अजून एका आरोपीला अटक, महत्वाची माहिती आली समोर…


Daund : दौंड शहरातील बोरावके नगर येथील युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे यांची अज्ञात इसमाने डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केला असल्याचे घटना उघडकीस आली.

आता या खुनाचा उलगडा करण्यात दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून याप्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बोरावके नगर येथील सेवा रस्त्याने लिंगाळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर खुनाची घटना घडली.

अमोल साळुंखे यांच्या खुनातील आरोपींची संख्या दोन झाली आहे. अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी दिली. Daund

महेश गणेश काळे (वय 33, रा. बोरावकेनगर, गोपाळवाडी, दौंड. मूळ रा. अजनुज, श्रीगोंदा), असे सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश मोरे (रा. मोरे वस्ती) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड (बोरावके नगर) येथील युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे यांचा अज्ञात व्यक्तीने लिंगाळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर खून केला होता. सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस तपास करीत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून व्यावसायिक भागीदार महेश काळे याला सुरुवातीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगीतले की, अमोल हा आपल्याला भागीदारीतून बाहेर काढणार असल्याचा महेश याला संशय आला आणि त्याने रागाच्या भरात अमोल याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करीत खून केला अशी महिती दिली.

दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार गणेश मोरे याच्या सहाय्याने खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार आरोपी गणेश मोरे याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. अमोल साळुंखे खून प्रकरणी आरोपींची संख्या दोन झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!