वडीलांच्या पसंतीच्या लग्नास मुलीचा नकार, मुलगी थेट घर सोडून गेली अन्…; कुंजीरवाडीतील घटना


लोणी काळभोर : मुलींची आपण उच्च शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची घेण्याची इच्छा असताना आई-वडिलांनी तिच्या मनाविरुद्ध लग्नाचा तगादा लावल्याने मुलगी घर सोडून पळून गेल्याची घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली होती. लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या नातेवाईकांकडे सुखरूपपणे सुपूर्त केले आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितनुसार सदर १९ वर्षिय मुलीने बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. बारावी होताच तिच्या आईवडिलांनी तिचेमागे विवाहाचा तगादा लावला होता. परंतु तिला उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे रहावयाचे होते. त्यामुळे घरात वादविवाद होत होते. तिने आपणांस पुढे शिकायचं आहे मला आताच लग्न करायचं नाही. असे तिने आईवडिलाना वारंवार सांगितले होते. तिने याबाबत विनवणी करुनही तिचे आई वडील तिचा विवाह करून देण्याच्या भूमिकेवर ठाम होते.

आई वडीलांच्या भूमिकेवर नाराज होऊन तिने कोणालाही काहीही न सांगता कायमचेच घर सोडून देण्याचा निर्णय घेतला. आणि ती मोबाईल फोन बंद करून १५ ऑगस्ट रोजी घरातुन बाहेर पडली. आपली मुलगी घरात दिसत नाही हे लक्षात येताच तिच्या आईवडिलांनी तिचा शोध लोणी काळभोर सह कुंजीरवाडी तसेच पुणे परिसरात घेतला. याचबरोबर नातेवाईकांकडे चोकशी केली. परंतु ती कोठेही मिळून आली नाही. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

       

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस हवालदार चंद्रकांत माने, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे व त्याच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले. आणि मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. ती घरातून निघून गेल्यापासून तिने तिचा फोन बंद केला होता. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान उभे होते. पोलीस हवालदार संभाजी देवीकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साक्षीची पाठीमागील एक वर्षाची कॉल डिटेल काढली. त्यानंतर तिच्या मैत्रिणींची नावे समोर आली. पोलिसांनी मैत्रिणींना फोन करुन विचारणा केली. मात्र माहिती मिळत नव्हती.

तिची एक खास मैत्रीण कर्वेनगर परिसरात राहत असून तिच्याकडे फोन नाही. अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कर्वेनगर परिसरात तिचा शोध घेतला. तेव्हा ती तेथून काही दिवसापूर्वीच निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ती शिरूर येथील एका मैत्रिणीकडे राहत आहे. अशी मिळाली पोलिस पथक तेथे पोहोचले व तेथील मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती आली होती परंतु सकाळीच निघून गेली अशी माहिती मिळताच पथक माघारी आले.

त्यानंतर पोलिस पथकाला ती शिरूर तालुक्यातच दुसऱ्या मैत्रिणीकडे आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली. पथक तेथे पोहोचले त्यावेळी सदर मुलगी तेथे आढळून आली. तिला ताब्यात घेतलेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलीला तिच्या आईवडिलांकडे गुरुवारी (४ सप्टेंबर) रोजी सुखरूप सुपूर्त केले. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले,लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, संभाजी देवीकर, विजय जाधव, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!