पुणे हादरलं! बापाचाच राक्षसी चेहरा उघड; लेकीवर घरातच अत्याचार, मुलीनं पोलीस ठाणं गाठत केला भंडाफोड…


पुणे : ज्या बापावर मुलीच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते आणि जिच्यावर मुलगी डोळे झाकून विश्वास ठेवते, त्याच व्यक्तीने नात्याला काळिमा फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना सोमवारी (३० मार्च) घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई एका खासगी कंपनीत कामाला जाते. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आई कामावर गेल्यानंतर घरी मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच होते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने मुलीला धमकावत तिच्यावर जबरदस्ती केल्याचा संतापजनक प्रकार घडला.

या घटनेनंतर पीडित मुलीने धैर्य दाखवत थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्याला हजर केले जाणार आहे.

या संतापजनक घटनेमुळे चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!