Dattatray Bharne : इंदापूरमध्ये राडा! अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मतदारांना दमदाटी..

Dattatray Bharne : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले तेव्हापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत होता. नणंद-भावजय लढतीमुळे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

याच पार्शभूमीवर सोशल मीडियावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होते आहे. मतदारांना दमदाटी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. Dattatray Bharne
रोहित पवार यांनी भरणे यांचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा…

केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!” असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
