Dattatray Bharne : व्हायरल व्हिडीओनंतर दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण, म्हणाले, मी मराठीत बोललो, शिवीगाळ….

Dattatray Bharne : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले तेव्हापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत होता. नणंद-भावजय लढतीमुळे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
याच पार्शभूमीवर सोशल मीडियावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होते आहे. मतदारांना दमदाटी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत आमदार भरणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती ॲग्रोचा कुणीही येणार नसल्याचं दत्ता भरणे म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. याबाबत दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल व्हिडीओबाबत दत्तात्रय भरणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की, मी माझ्या मराठी भाषेत बोललो, पण मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यामुळे मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचं भांडण दिसलं. Dattatray Bharne
मी तिथे गेलो, त्यावेळी बारामती ॲग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता.त्याने माझ्या विरोधातही शब्द वापरले. मीसुद्धा माणूस आहे, मी त्याला विचारलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, गावकरी त्याच्यावर धावून आले.
निवडणूक आयोगात दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तक्रारीत म्हंटले गेलं आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मी दबाव टाकत असेल,असे वाटत असेल तर व्हिडीओमध्ये जे लोक दिसत आहेत.
त्यांचे जबाब नोंदवा. त्यांना विचारा, तिथे पैशाचं वाटप कोण करत होतं, नोकऱ्यांचं आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगातही मी हेच सांगीन. तक्रारीला कायदेशीर पद्धत्तीनं उत्तर देईन. असे ते म्हणाले आहे.