आधी रुपाली चाकणकरांची बाजू घेणाऱ्या दत्तामामा भरणेंचा सूर अचानकच बदलला, म्हणाले, अजितदादांनी आम्हाला..


पुणे : राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची पाठराखण करणारे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. यामुळे खरात प्रकरण त्यांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरले आहे.

आज रुपाली चाकणकर यांचा विषय आल्यानंतर दत्तात्रय भरणे यांचा सूर एकदम बदलल्याचे दिसून आले. ते म्हणाले, मी आधी जेव्हा बोललो होतो, तेव्हा मला बाबा अशोक खरात याच्याबाबत जास्त माहिती नव्हती. मला एकंदर हे प्रकरण माहिती नव्हते. पण नंतर कळालं की, अशोक खरात हा भोंदूबाबा आहे. अशा लोकांना वेगळ्याप्रकारे ठोकून काढले पाहिजे.

राज्यात चांगले महाराजही आहेत. पण 100 पैकी एखादवेळी अशी गोष्ट घडते आणि तेच तेच वाजवले जाते. काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात. मला त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून मी त्यावेळी तशी प्रतिक्रिया दिली. शेवटी आमच्यासाठी कार्यकर्त्यांना जपणे महत्त्वाचे असते, याबाबत मुख्यमंत्र्यानी आदेश दिले आहेत.

दरम्यान, मी खरात याची बाजू कधीच घेणार नाही. राज्यात अंधश्रद्धा कायद्याचा वापर होत नाही. आता या प्रकरणातून शिकायला मिळेल. आता तरी या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. चौकशी मध्ये जे काही बाहेर येईल ते समजेल. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असेही भरणे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!