NDA चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार लवकरच जाहीर, पंतप्रधान आणि जेपी नड्डा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवणार…


नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं असून, ९ सप्टेंबर २०२५ रोजी या पदासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, एनडीएकडून यावेळी एक धक्कादायक रणनीती राबवली जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, भाजपकडून यंदा पारंपरिक नावांपासून दूर जात अनपेक्षित व्यक्तीस उमेदवार म्हणून पुढे आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

एनडीएच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा झाली. यावेळी भाजपकडून निवडणूक व्यवस्थापन आणि उमेदवार निवडीसाठी जेपी नड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

यामुळेच सध्या चर्चा नसलेलं, पण भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकणारं नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या रणनीतीचा उद्देश म्हणजे विरोधकांना गृहित धरता येणार नाही असा उमेदवार मैदानात उतरवणं. एनडीएकडे यावेळी पूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!