नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात प्रकरण ; रिक्षा चालकाच्या मुलीचा आरोपावरून युटर्न, नेमकं काय घडलं?

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने पुण्यातील सिंहगड रोडवर एका रिक्षाला मागून जबर धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.या अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नसली तरी गाडी तिची असल्यामुळे चर्चा सुरु होती. कारची मालक असलेल्या गौतमीने मदत न केल्यामुळे संबंधित रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता रिक्षा चालकाच्या मुलीने आरोपावरून यूटर्न घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. तिच मुलगी गौतमी पाटीलसोबत दिसून आली. इतकच नाही तर तिने गौतम पाटीलचे आभार देखील मानले.

रिक्षाचालकाची मुलगी म्हणाली, जे काही आरोप केले होते ते आम्हाला पुरावे मीळत नव्हते. आता मला पोलीस प्रशासानाने सर्व पुरावे दिले आहेत. गौतमी पाटील जरी भेटायला आल्या तरी कायदेशीर प्रक्रीया सुरू राहील. कोर्टात केस लढली जाईल. गौतमी पाटीलकडून मी कोणतीही मदत घेतली नाही. माणुसकी म्हणुन गौतमी पाटील आम्हाला भेटायला आल्या आहेत. काल त्या भेटायला आल्या होत्या. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे काढायचा प्रयत्न केला आशी त्यांनी माहीती दिली. आम्ही कोणतीही १० लाख, १५ लाख रूपयाची मागणी केली नाही. गौतमी पाटील यांनी आम्हाला कधीही मदत लागली तर ती द्यायला तयार आहे आसे सांगितले. परंतु आता तरी मी सध्या समर्थ आहे माझ्या वडिलांची काळजी घ्यायला. गौतमी पाटील यांनी आमची हालहवाल माहिती घ्यावी हिच इच्छा होती. त्या आल्या त्यांनी भेट घेतली आहे असे रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगळे यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला..या अपघातात रिक्षेला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षा तीन वेळा पटली झाली. गाडीतील लोक उतरले आजूबाजुला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत तेथून निघून गेले. त्यानंतर काही लोकांनी रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल केले.
