दादा नडला पण अण्णा नाय पडला!! चंद्रराव तावरे यांनी गड राखला, सहकार बचाव पॅनलला एका जागेवर विजय…

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्ता मिळवत सर्वांना मोठा धक्का दिला. असे असताना सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांना पराभूत करण्याचे मनसुबे मात्र धुळीला मिळाले आहे.
त्यामुळे अजित पवार यांचा सर्व ताकदीशी उतरुनही चंद्रराव तावरे ८५ वर्षात मैदान मारले आहे. अजित पवार यांचे २० उमेदवार जवळपास विजयी झाले असून चंद्रराव तावरे यांचा पराभव ते घडू शकले नाही. त्यामुळे कारखान्यावर संपूर्ण वर्चस्व मिळण्याचे प्रयत्न असफल ठरले आहे.
सुरुवातीपासूनच ही निवडणूक चांगलीच गाजली होती. अजित पवार यांनी थेट राज्यात देवेंद्र फडणवीस हे आपला शब्द ऐकतात असे सांगून निवडणुकीअधी विरोधक असलेल्या चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. ऐवढ्यावर ते न थांबता राज्यातील कुठलीही सत्ताधारी नेता या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही असा गर्भित इशारा दिला होता.
तरीही विरोधकांंनी राज्यातील भाजप नेत्यांचे न ऐकता अजित पवार यांच्याशी संपूर्ण ताकदीने लढा दिला. सत्तेची ताकद एकवटली असताना चंद्रराव तावरे यांनी स्वतः चा सफाईदार विजयी घडविल्याने ‘दादा नडला पण आण्णा नाही पडला ‘ असे वाक्य बारामतीत ऐकू येत आहे.